वाल्मिक कराडच्या प्रतिमेला शिवसैनिकांनी मारले जोडे, फाशी देण्याची केली मागणी

 वाल्मिक कराडच्या प्रतिमेला शिवसैनिकांनी मारले जोडे, फाशी देण्याची केली मागणी
  • MG News
  • मार्च 4 2025

Share on  

 वाल्मिक कराडच्या प्रतिमेला शिवसैनिकांनी मारले जोडे, फाशी देण्याची केली मागणी

बुलढाणा :  मस्साजोग येथील सरपंच स्व. संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी मंगळवारी सायंकाळी शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात आरोपी वाल्मिक कराडच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करून घटनेचा निषेध व्यक्त केला. सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाचे व्हिडिओ व छायाचित्र व्हायरल झाले आहेत. आरोपींनी अतिशय क्रूरपणे सरपंच देशमुख यांची हत्या केली. या घटनेचा तीव्र संताप शिवसैनिकांनी प्रतिमेला जोडे मारून संताप व्यक्त केला. तालुकाप्रमुख रामा थारकर, शहर प्रमुख संतोष लिप्ते यांच्या नेतृत्वात हे निषेध आंदोलन करण्यात आले.

संबंधित बातम्या