औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता असं अबू आझमी यांनी आज म्हटलं. त्यांच्या या वक्तव्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. औरंगजेब याचे अबू आझमी यांनी कौतूक करत औरंगजेब क्रूर शासक नव्हता. त्याने अनेक मंदिरे बनवली, असा खळबळजनक दावा अबू आझमी यांनी विधानसभेच्या परिसरात केला. आमच्या महापुरुषांबद्दल जे काय वक्तव्य केलेले आहेत तसेच महापुरुषांचा अपमान केलेला आहे. जे काही भलामण करतोय एक प्रकारे देशद्रोह असल्याचे म्हस्के यांनी सांगितले. त्यांनी आमदारकीच्या राजीनामा द्यावा अशी मागणी संतप्त शिवसैनिकांनी केली आहे. राज्यपाल, मुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्याकडे देखील पत्राद्वारे मागणी केली आहे.
आमदार असताना जी काही देशाप्रती शपथ घेतली होती त्याच्या विरोधात त्यांनी काम केलेल आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री यांनी कडक आदेश काढलेले आहेत. महापुरुषांबद्दल अपमान करणाऱ्यावर जी काय स्पर्धा लागलेली आहे यांना वेळीच ठेचले पाहिजे. वेळीच पोलीस ठाण्यात टाकलं पाहिजे. कारवाई करायला पाहिजे अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचे म्हस्के यांनी सांगितले.
उबाठा पक्षाने हिम्मत हरलेली आहे. त्यांच्याकडे आंदोलन करायला माणसं सुद्धा नाही आहेत. त्यांनी आपला हिंदुत्वचा विचार आणि हिंदुत्वाचा तत्व इंदिरा गांधी यांच्या घरात गाहाण ठेवलेली आहे. त्यांना प्रथम राहुल गांधी आणि सोनिया गांधींची परवानगी घ्यावा लागेल. त्यानंतर ते आंदोलनात उतरतील असा टोला म्हस्के यांनी लगावला.