नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गावर जवळपास पुर्ण झालेला आहे. पथदिव्यांचे खांब लावलेले असूनही त्यावर मात्र दिवे लावलेले नाही. ही स्थिती एक तप उलटूनही कायम आहे. मोठी दुर्घटना घडल्यानंतर महामार्गावरचे दिवे सुरु करणार का? असा संतप्त सवाल शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित करत संबंधित महामार्ग अधिकाऱ्याला चांगलेच धारेवर धरले. आज लवकरात लवकर दिवे सुरु करण्याची मागणी केली. दरम्यान, काही दिवसांत दिवे सुरु न झाल्यास आंदोलनाचा इशारा शिंदे सेनेकडून देण्यात आला आहे.