रवींद्र चव्हाण यांनी जिल्ह्यात भाजप गेल्या तीन-चार वर्षात कशा पद्धतीने वाढवली हे सिंधूदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांनी बघीतले आणि आता ती कशी कोलमडली आहे हे सिंधुदुर्गवासीय बघत आहेत. असे प्रतिपादन माजी आमदार वैभव नाईक यांनी केले आता आमिषाला भुलून भाजपचे कार्यकर्ते सोडून जात आहेत. हे कार्यकर्ते आमिषामुळे निवडणूक काळात भाजपमध्ये आले होते. ते भाजपचे कधीच नव्हते. सिंधुदुर्गात खासदार भाजपचा, पालकमंत्री भाजपचा, प्रदेशाध्यक्ष सिंधुदुर्गचे, मुख्यमंत्री, पंतप्रधान भाजपचे असं असतानाही कार्यकर्ते सोडून जात आहेत. यातच भाजपची हतबलता दिसतेय, असेही माजी आमदार महायुतीच्या जिल्ह्यातील वादाविषयी बोलताना पुढे म्हणाले.