SOLAPUR | अखेर 9 जूनला सोलापुरातून गोव्यासाठी उडणार विमान 

SOLAPUR | अखेर 9 जूनला सोलापुरातून गोव्यासाठी उडणार विमान 
  • MG News
  • मे 28 2025

Share on  

अखेर 9 जूनला सोलापुरातून गोव्यासाठी उडणार विमान 

 सोलापूरकरांना अनेक वर्षांपासून विमानसेवेची प्रतीक्षा होती, अखेर तो दिवस जवळ आल्याची माहिती सोलापूर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनी जाहीर केली. येत्या ९ जूनपासून सोलापूर ते गोवा कमर्शियल विमानसेवा सुरू होणार आहे. मात्र, ही सेवा उडान योजनेंतर्गत नसणार आहे. त्यामुळे जादा पैसे मोजून सोलापूरकरांना विमानातून प्रवास करावा लागणार आहे. सोलापूर ते गोवा कमर्शियल विमान प्रवासाचे तिकीट दर कमीत कमी ३,४९१ रुपये, तसेच जास्तीत जास्त ५ हजार ६०० रुपये इतके असणार आहे. मंगळवार दुपारपासून ऑनलाइन तिकीट बुकिंग सुरू झाले असून, तिकीट बुकिंग करण्यासाठी अनेकांनी वेबसाइटला भेट दिली.

संबंधित बातम्या