सोलापुर : खासदार उदयनराजे भोसले यांनी उडवली कॉलर
सोलापुरात स्पिन्का वॉटर कंपनीच्या उदघाटन सोहळ्यात खासदार उदयनराजे भोसले यांनी कॉलर उडवून सर्वांचं लक्ष वेधून घेतल. या उदघाटन सोहळ्यात भाषण करत असताना, उदयनराजे यांनी कॉलर उडवून उपस्थितांच लक्ष वेधून घेतलं आहे. आयुष्यात प्रत्येकाची एक स्टाईल असते. रजनीकांतची गॉगल उडवण्याची स्टाईल आहे. त्याच पद्धतीने आपण कधी कोणाबद्दल वाईट चितल नाही, त्यामुळं आपली कॉलर टाईट आहे. असं म्हणत उदयनराजे यांनी कॉलर उडवली. तेंव्हा उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करून उदयनराजे भोसले यांच्या कृतीला प्रतिसाद दिला.