सोलापूर | प्रतिनिधी
पाकिस्तानवर भारताने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर देशभरातून केंद्र सरकारच्या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे. पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, "देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या मागे देश १००% उभा आहे."
मंत्री पाटील म्हणाले, “भारताकडून ९ ठिकाणी एअर स्ट्राईक करण्यात आली आहे आणि ही कारवाई देशवासीयांना अपेक्षित होती. मागील काळात पाकिस्तानकडूनही अशाच प्रकारे एअर स्ट्राईक करण्यात आले होते. यावेळेस २६ भारतीयांचे प्राण गेले आणि त्यामुळे पाकिस्तानला ठोस प्रत्युत्तर देणे गरजेचे होते.”
ते पुढे म्हणाले, “देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे एक योग्य पाऊल आहे. जी कारवाई झाली, ती वेळेवर झाली आणि स्वागतार्ह आहे. त्यामुळे संपूर्ण देश आपल्या पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.”
पाकिस्तानच्या सातत्याने सुरू असलेल्या कुरापतींबाबत बोलताना त्यांनी सांगितले, “पाकिस्तानची वृत्ती सुरुवातीपासूनच भारतात दहशतवाद पसरवण्याची आणि सीमेवरील गावांवर हल्ले करण्याची राहिली आहे. अशा प्रवृत्तींना एकदाच ठोस उत्तर देणे आवश्यक होते, आणि आज आपण ते उत्तर दिले आहे.”
तथापि, मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले की, “ही केंद्र सरकारची गोष्ट असल्यामुळे त्यावर अधिक बोलणे उचित नाही. पीओकेबाबत केंद्र सरकारच्या मनात काही योजना असतील, पण त्या त्यांच्या विचारसरणीचा भाग आहे आणि त्यावर मी भाष्य करणे योग्य ठरणार नाही.”
शेवटी, त्यांनी देशाच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत म्हटले, “आपल्या पंतप्रधानांचा स्वभाव आणि निर्णयक्षमता लक्षात घेतल्यास, देशासाठी जे योग्य आहे ते निश्चितच घडेल.”