ठाण्यात होळीच्या पूर्वसंध्येला माणुसकीचे रंग उधळत धुळवड साजरी करण्यात आली. ठाण्यातील समाजसेवक किरण नाकती यांच्या माध्यमातून अभिनय कट्ट्यावर बुधवारी विशेष मुलांची, विशेष होळी साजरी झाली. दिव्यांग मुलांसमवेत पर्यावरणपुरक होळी पेटवून नैसर्गिक रंगाची उधळण करीत एक आगळा वेगळा संदेश समाजाला देण्यात आला.
ठाण्यातील नौपाडा, भास्कर कॉलनी येथील जिजामाता उद्यानालगतच्या अभिनय कट्यावरील दिव्यांग कला केंद्रात किरण नाकती यांनी बुधवारी विशेष मुलांसाठी होलिकोत्सवाचे आयोजन केले होते. यंदा या होळी उत्सवाचे १० वे वर्ष आहे. यावेळी दिव्यांग मुलामुलींनी काम, क्रोध, मोह, लोभ, मद आणि मत्सर या षडरिपुचे होळीत दहन करून समाजातील वाईट प्रवृत्तीना ईश्वराने सद्बुद्धी देण्याची भावना व्यक्त केली. नंतर, संगीताच्या तालावर माणुसकिचे रंग उधळत धुळवड खेळताना या मुलांनी आपल्या निरागसतेचे दर्शन घडवले. विशेष मुलांच्या होळीचे आयोजन करणाऱ्या किरण नाकती यांनी, प्रदुषण मुक्त पर्यावरण पुरक होळी साजरी करून या विशेष मुलांच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान हेच या उपक्रमाचे फलीत असल्याचे आवर्जुन नमुद केले. या विशेष होलिकोत्सवाला स्थानिक नागरिकांसह प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीनीही हजेरी लावुन मुलांना प्रोत्साहित केले.
BYTE - किरण नाकती, शिवसेना नौपाडा विभाग प्रमुख..
BYTE - विद्यार्थ