कल्याण ग्रामीण सत्तावीस गावच्या समस्यांबाबत संघर्ष समिती पदाधिकाऱ्यांनी घेतली महापालिका आयुक्तांची भेट

 कल्याण ग्रामीण सत्तावीस गावच्या समस्यांबाबत संघर्ष समिती पदाधिकाऱ्यांनी घेतली महापालिका आयुक्तांची भेट
  • MG News
  • मे 27 2025

Share on  

 कल्याण ग्रामीण सत्तावीस गावच्या समस्यांबाबत संघर्ष समिती पदाधिकाऱ्यांनी घेतली महापालिका आयुक्तांची भेट

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या 27 गावांच्या विकासाबाबत संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेत भेडसावणाऱ्या समस्यांचा पाढा आयुक्तांसमोर वाचून दाखवला. या बैठकी दरम्यान या गावातील रस्ते आणि गटांच्या दुरावस्थेचा मुद्दा पदाधिकाऱ्यांनी लावून धरला.  गावातील वाढीव कराच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. या गावातील ग्राम पंचायत अस्थायी कर्मचाऱ्यांना स्थायी करण्याच्या मागणीवर देखील चर्चा करण्यात आली. संत सावलाराम स्मारकासाठी अधिकारी आहेत वास्तविकारक नेमणूक त्याची उभारणी करण्यात यावी, अशा विविध मागण्यांसाठी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांची भेट घेत आपल्या व्यथा मांडल्या. आयुक्तांनी देखील या संपूर्ण बैठकीचे सकारात्मकता दाखवत मागण्या लवकरच पूर्ण करणार असल्याचे आश्वासन दिले.

संबंधित बातम्या