ठाणे शहरातील खड्ड्यावरून मनसे आक्रमक होत आहे. शासनाचे खड्ड्याचा प्रश्नाकडे लक्ष जावे यासाठी मनसेच्या वतीने घोडबंदर घाट परिसरात खड्ड्यांची पीडब्ल्यूडी, एमएसआरडीसी, एमएमआरडीए, टीएमसी विभागाच्या अधिकाऱ्यांला घेऊन पाहणी करण्यात आली. जर येत्या एक महिन्यात जर खड्डे भरले नाही तर मनसेकडून आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिला. ठाण्यातील घोडबंदर रोडवर खड्ड्यांमुळे नागरिकांचा जीव गेलेला आहे. त्यामुळे हा निष्पाप जीव नेमका कोणामुळे गेला? असा प्रश्न मनसे नेते अविनाश जाधव यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारला आहे.