THANE | महिलांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने 3000 बसेसच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात - मंत्री प्रताप सरनाईक

THANE | महिलांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने 3000 बसेसच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात - मंत्री प्रताप सरनाईक
  • MG News
  • मे 28 2025

Share on  

महिलांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने 3000 बसेसच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात - मंत्री प्रताप सरनाईक

मंत्री प्रताप सरनाईक असे म्हणाले की, स्वारगेटच्या घटनेनंतर राज्य शासनाने गंभीरतेने पावले उचलली.
महिलांची सुरक्षा आणि सुरक्षित प्रवास या अनुषंगाने 3000 बसेसच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात केली आहे. त्यात जीपीएस यंत्रणा असणे गरजेचे आहे ,बस ड्रायव्हरला कधी कधी झोप येते किंवा बस ड्रायव्हर दारू पिऊन गाडी चालवतो, वायफाय सुविधा आहे जी बस मध्ये मिळत नाही ,ज्या सुविधा खाजगी बस मध्ये मिळतात त्या सर्व सुविधा या बसमध्ये मिळाव्यात अशाप्रकारे बस बनवण्यात आली आहे. दहा वर्ष ज्या रस्त्यावर असतील अशा बसेसमध्ये ही यंत्रणा आम्ही बसवत आहोत. ६० टक्के खर्च हा केंद्रशासन करणार आहे आणि 40% खर्च राज्य शासन करणार आहे .सर्व कंपन्यांना सांगितले आहे की, चांगल्या बस बनवा. सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षेचा प्रश्न उद्भवू नये. स्वारगेट मध्ये एका व्यक्तीने अत्याचार केला होता एका मुलीवर, यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा असली पाहिजे. दरवाजा कोणीही उघडू नये यासाठी यंत्रणा असली पाहिजे.
पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री यांचे निवेदन ऐकायला मिळेल. नाशिक सिन्नरला घटना झाली २०११ ला डेपो बनवला होता तो कोलाप्स झाला.
ज्या ज्या ठिकाणी अशा घटना घडल्या त्याची चाचपणी करावी.पीपीपी बस डेपो आम्ही तयार करत आहोत.५००० बसेस आम्ही स्मार्ट बस करू ३००० नवीन बस येत आहेत.
महापालिका निवडणुकीत १०७ की १०० जागा हे माध्यमांवर पहिलं तशी काही चर्चा झाली असेल तर आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत. 
एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे भविष्यात युती म्हणून लढू आणि बाकी इतर निर्णय तिन्ही नेते एकत्र बसून घेतील.
 

संबंधित बातम्या