काम करतो चालकाचे तरीही पाचशे कोटीची संपत्ती  संभाजीनगरच्या जावेद शेखची अजब कथा 

काम करतो चालकाचे तरीही पाचशे कोटीची संपत्ती  संभाजीनगरच्या जावेद शेखची अजब कथा 
  • MG News
  • जुलै 22 2025

Share on  

जो एका व्यक्तीच्या गाडीवर चालकाचे काम करतो आणि पत्र्याचा खोलीत राहतो त्याचाकडे पाचशे कोटीची संपत्ती मिळाण्याची धक्कादायक घटना घडकीस आली आहे. जावेद शेख असे त्या चालकाचे नाव आहे.  एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरे यांचा जावेद चालक आहे.जालना रोडवरची तब्बल सहा एकर जमीन जावेद शेखच्या नावावर आहे.  संभाजीनगरमधल्या पुंडलिक नगरातल्या हुसेन कॉलनीमध्ये त्याचं घर आहे. पत्र्याच्या घरात जावेद राहतो.

 जावेद शेखकडे पाचशे कोटींची सहा एकर जमीन असल्याचे आरोप एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी केले होते. आता जावेद शेखला नोटीस आल्यानंतर जलील यांनी पुन्हा भुमरेंवर निशाणा साधला आहे.  सहा एकर जमीन ही हैदराबादच्या सालारजंग कुटुंबानं भेट म्हणून  आपल्याला दिल्याचा जावेद शेखचा दावा आहे. आता जावेद शेख इन्कम टॅक्सच्या नोटिशीला काय उत्तर देतो, त्यामधून या 500 कोटींच्या जमिनीचं गूढ उकलणार आहे. 

संबंधित बातम्या