| संगमनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र काकडवाडी येथील महालक्ष्मी माता काकडवाडी मंदिरात चोरी

| संगमनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र काकडवाडी येथील महालक्ष्मी माता काकडवाडी मंदिरात चोरी
  • MG News
  • मार्च 9 2025

Share on  

 

 संगमनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र काकडवाडी येथील जागृत देवस्थान महालक्ष्मी माता काकडवाडी मंदिर याठिकाणी मध्यरात्रीच्या सुमारास जबरी चोरीची घटना घडली आहे. काल मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी महालक्ष्मी मंदिर येथील देवीचा ५१ तोळ्यांचा मुकुट तसेच अडीच किलो चांदीच्या वस्तू इतरही मौल्यवान वस्तू चोरट्यांनी चोरून नेते पोबारा केला आहे. तर मंदीर परिसरामध्ये असणारे सीसीटीव्ही कॅमेरेच्या DVR देखील चोरट्याने चोरून नेला आहे.
     घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, एलसीबीचे पी.आय.दिनेश आहेर,पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे, पोलीस उपनिरीक्षक सातपुते, पोलीस उपनिरीक्षक अशोक मोकळ यांनी भेटी दील्या आहेत. तपासकामी अहिल्यानगरहून ठसा तज्ञ व शवान पथकाला पाचारण करण्यात आले होते. सदर घटनेचा लवकरात लवकर शोध लावावा अशी मागणी काकडवाडी गावाचे माजी सरपंच जनार्दन कासार यांनी केली आहे. तसेच सदर घटनेविषयी पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांनी अधिक माहिती दिली आहे. सदर घटनेचा अधिक तपास संगमनेर तालुका पोलीस स्टेशन सह अहिल्यानगर एलसीबीच्या वतीने करण्यात येत आहे.
 

संबंधित बातम्या