कळवण तहसीलदार कार्यालयातील प्रलंबित क्षेत्र रस्ता दावे तातडीने निकाली काढावे

कळवण तहसीलदार कार्यालयातील प्रलंबित क्षेत्र रस्ता दावे तातडीने निकाली काढावे
  • MG News
  • जानेवारी 8 2025

Share on  

या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य शिव पांदन  शेत रस्ता चळवळीचे प्रनेते  यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी कळवण तहसीलदार रोहिदास वारोळे यांना देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की शासन निर्णयाची अंमलबजावणी करत तालुका शेत रस्ता समितीच्या वतीने तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना ग्राम शेती रस्ता समित्यांच्या वतीने तातडीने आदेश द्यावे तालुक्यातील सर्व वहिवाटी रस्त्यांचे सर्वेक्षण करून त्यांच्या नोंदी गाव नकाशावर घेण्यात याव्या, शासन निर्णयाप्रमाणे मोजणी शुल्क व पोलीस संरक्षण फी बंदीची अंमलबजावणी तातडीने करण्यात यावे शिव पांदन शेत रस्त्याचे सर्वेक्षण करून ,वहिवाट रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्यांवर   कारवाई करुन दंड सुरू करा ,तहसीलदार कार्यालयामध्ये येणाऱ्या प्रत्येक अर्जाला उत्तर देणे बंधनकारक करा शिव पांदन शेत रस्त्यांच्या हद्द खुणा निश्चित करून समृद्ध गावा साठी दर्जेदार रस्ते करावेत शेत रस्ता अभावी  शेत जमीन दारकांचे मोठं शेती पिकांचे नुकसान होत असते नुकसान भरपाई देण्यात यावी, आधी मागण्या करत आपल्या तसेच यंत्र सामग्री शेतीला बाजारात पोहोचवण्याकरता आपत्कालीन घटनांमुळे जीवित हानीचे वाढते धोके त्याचबरोबर शेतकरी शेतातील व्यवस्थित असू दळणवळणासाठी दर्जेदार रस्त्यांची आवश्यकता असते शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे याची दखल घेऊन प्रशासनाने शासन निर्णयाची कडक अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना रस्ते उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे

संबंधित बातम्या