शिर्डीच्या साई समाधी मंदिराला पाइप बॉम्बने उडवून देण्याची धमकी
जगप्रसिद्ध शिर्डीच्या साई समाधी मंदिराला पाइप बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल मिळाल्याने खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी शिर्डी देवस्थानच्या प्रशासनाला या धमकीचा मेल आला आहे. या मेलमध्ये आणखी काय आहे, याबाबत अजून काही खुलासा झालेला नाही.सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनीदेखील या मेलविषयी अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे. साई संस्थानला धमकी मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही, यापूर्वी देखील धमकीचे मेल आले आहेत. पण तपासाअंती हे मेल बनावट असल्याचे आढळून आले होते. पण जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी (Terrorist) हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशात आधीच संतापाची लाट असताना,शिर्डीतील साईसंस्थान मंदिरालाही बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीच्या मेलमुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. या धमकीच्या मेलमुळे पोलिस यंत्रणा अलर्ट झाली असून, हा मेल खरचं धमकीचा आहे की, कोणी खोडसाळपणा केला, याचा तपास पोलिस घेत आहे.