केंद्रीय राज्यमंत्री  रक्षा खडसे यांच्यामुळे अमेरिकेतील भारतीय दांम्पत्याचा सुखरुप झाला विमानप्रवास 

केंद्रीय राज्यमंत्री  रक्षा खडसे यांच्यामुळे अमेरिकेतील भारतीय दांम्पत्याचा सुखरुप झाला विमानप्रवास 
  • MG News
  • जुलै 21 2025

Share on  

केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी केलेल्या मदतीमुळे भारतीय नागरिकत्व असलेल्या मात्र अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या दांम्पत्यास सुखरुपपणे भारतात येता आल्याची घटना घडलीये‌

मूळच्या छत्रपती संभाजी नगर येथील असलेल्या आणि सध्या अमेरिकेत स्थायिक असलेल्या नेहा महाजन यांना पुण्यात आजारी असलेल्या आईच्या भेटीसाठी तातडीनं भारतात यायचं होतं. त्यासाठी त्यांनी विमानाची तिकीटं काढली, पण दोन वर्षाच्या चिमुकलीचा व्हिसा नसल्यानं मोठी अडचण निर्माण झाली. मुलीशिवाय जाणं शक्य नव्हतं, इमर्जन्सी व्हिसाला ७२ तासांचा अवधी लागणार होता. आपली मोठी अडचण झाल्यानं शुक्रवारी सकाळी महाजन कुटुंबीयांनी केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांना संपर्क केला. दहाच मिनिटांत खडसे यांची यंत्रणा कार्यरत झाली आणि महाजन कुटुंबाकडून लहान मुलीच्या आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. दिल्लीतील यंत्रणा आणि अमेरिकेतली दुतावासाशी संपर्क साधत काही तासांतच रक्षा खडसे यांनी चिमुकलीला व्हिसा मिळवून दिला. अखेर दांपत्य अमेरिकेतून भारतात येण्यासाठी विमानात बसले.

अमेरिकेतून निघालेल्या विमानानं पॅरिस विमानतळावर थांबा घेतला यावेळी आठ वर्षाच्या मुलाच्या पासपोर्ट व्हिसामध्ये तांत्रिक अडचणीचं कारण सांगून एअरलाइन व सुरक्षा यंत्रणांनी कुटुंबाला अडवलं त्यासाठी दोन तास विमानही थांबवण्यात आलं. फ्रेंच कर्मचारी कुठल्याही भारतीय व्यक्तीशी बोलण्यास सुद्धा तयार नव्हते. महाजन यांचा भारतीय दुतावासातील अधिकाऱ्यांशी संपर्क होत नव्हता, अशा परिस्थितीत मंत्री खडसे यांनी पर्यायी एअर इंडियाच्या विमानानं मुलांना भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दोन तासाच्या गोंधळानंतर अखेर यशस्वी वार्तालाप झाल्यानंतर एअर फ्रान्सनं रविवारी पहाटे हे कुटुंब भारतात लँड झालं.

 
 

 


 
 

संबंधित बातम्या