उपचारासाठी रुग्णालयात आलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी डॉक्टर व कर्मचाऱ्यांना मारहाण करीत रुग्णालयातील साहित्यांची तोडफोड करुन नुकसान केल्याची घटना नवापूर येथे घडली आहे. याप्रकरणी डॉक्टरांनी दिलेल्या फिर्यादीवरुन नवापूर पोलिस ठाण्यात सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून या मारहाणीच्या घटनेचा नवापूर डॉक्टर असोसिएशनने निषेध नोंदविला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, गुजरात राज्यातील सुंदरपूर येथील राजूभाई फत्याभाई गामीत यांना श्वास घेण्याचा त्रास होवू लागला. तसेच त्यांच्या छातीतही दुखू लागल्याने उपचारासाठी त्यांना नवापूर येथील डॉ. अजय कुवर यांच्या नोबेल हॉस्पीटलमध्ये आणण्यात आले. याठिकाणी रुग्णालयातील सहकारी डॉक्टरांनी राजूभाई गामीत या रुग्णावर प्राथमिक उपचार केला. त्यानंतर डॉ. अजय कुवर यांनीही येवून उपचार केते. परंतु हृदयविकाराचा झटक्यामुळे राजूभाई फत्याभाई गामीत यांचा मृत्यू झाला. त्यामुळे वेळेवर उपचार मिळाला नाही व डॉक्टर उपचारासाठी लवकर आले नसल्याचा आरोप करीत मयताच्या नातेवाईकांनी डॉ. अजय कुवर यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. तसेच इतर कर्मचाऱ्यांनाही देखील मारहाण करण्यात आली आहे. त्याचबरोबर नोबेल हॉस्पीटलमधील कॉम्प्युटर व वैद्यकीय साहित्यांची तोडफोड करीत मालमत्तेचे नुकसान केले. या तोडफोड व मारहाणीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाला आहे. हा प्रकार काल मंगळवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास नोबेल हॉस्पीटलमध्ये घडला. याबाबत डॉ. अजय कुवर यांनी नवापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पाच ते सहा अनोळखींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आता आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे करीत आहेत.
त्या संदर्भात कारवाई झाली नसल्याकारणाने त्यासंदर्भात नवापूर डॉक्टर असोसिएशन तर्फे आज नवापूर तालुक्याचे कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आहे आहे.काल दिनांक 11/3/25 रोजी नोबेल हॉस्पिटलचे डॉक्टर अजय कुवर यांच्यावर रुग्णाच्या नातेवाईकांकडून प्राणघातक हल्ला झालेला आहे त्या संदर्भातील FIR आम्ही कालच नोंदवली देखील आहे. प्रशासनाकडून आम्हाला कार्यवाहीची अपेक्षा आहे. हा अर्ज देईपर्यंत तरी अपेक्षित अशी कार्यवाही झालेली नाही असे कळले. तरी आम्ही सर्व आपणास पुनश्च एकदा निवेदन देवू इच्छितो की झालेल्या प्रकरणातील दोषर्षीना कडक शासन व्हावे व अशी घटना पुन्हा घडू नये. कायद्यानुसार अपेक्षित कार्यवाही जर उद्या झालेली नसेल तर आम्ही नवापूर तालुक्यातील सर्व वैद्रद्यकीय क्षेत्रात काम करणारे डॉक्टर्स व इतर सर्व संलग्न, उद्या आमचे काम एका दिवसासाठी पूर्णपणे बंद ठेवणार आहोत. अत्यावश्यक सेवा देखील बंद राहतील याची आपण नोंद घ्यावी यानंतर देखील अपेक्षित कार्यवाही झालेली नाही, असे असल्यास, आम्ही आमचे आंदोलन जिल्हास्तरापर्यंत नेऊन संपूर्ण जिल्ह्यातील वैद्यकीय सेवा जो पर्यन्त दोर्षीवर कार्यवाही होत नाही तोपर्यंत बंद ठेवणार आहोत. आम्ही आपणास याची पूर्वकल्पना देत आहोत असे नवापूर डॉक्टर असोसिएशन यांनी सादर केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे....