वसई : ऑनलाइन गेमच्या व्यसनापायी मुलाकडून आईची हत्या

 वसई : ऑनलाइन गेमच्या व्यसनापायी मुलाकडून आईची हत्या
  • MG News
  • जुलै 29 2025

Share on  

गेल्या काही वर्षांमध्ये  ऑनलाईन गेमिंगच्या आहारी तरुणाई गेल्याचे दिसत आहे.युवावर्गाला नैराश्य देण्यापासून गुन्हे वाढण्याच्या घटना या ऑनलाईन गेममुळे होतांना दिसतात. असीच एक गुन्हेगारीची घटना वसईत घडली आहे. याठिकाणी एका ३२वर्षीय युवकाने ऑनलाईन गेमसाठी पैसे देत नाही म्हणून आपल्या सावत्र आईचा खुन केल्याची घटना उघडकीस आली आहे.इम्रान खुसरो असे खुन करणाऱ्या मुलाचे नाव आहे.तर आरसीया खुसरो असं मृत आईचे नाव आहे.

व्हीआरपीओ' नावाचा गेम खेळण्यासाठी इम्रानला1 लाख 80 हजारांची गरज होती. त्याने हे पैसे सावत्र आई आरसीया हिच्याकडे मागितले. मात्र तिने पैसे दिले नाहीत. या रागात इम्रान शनिवारी बाभोळा येथील आरसीया यांच्या घरी गेला आणि तिथं त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून डोके आपटून आईचीच क्रूर हत्या केली.घडला सर्व प्रकार इम्रानेने वडिलांना सांगितला आणि त्यानंतर दोघांनी पुरावा नष्ट करण्यासाठी तातडीने विधी करत मृतदेह दफन करून नैसर्गिक मृत्यू असल्याचं भासवलं होतं. या बाप लेकाने परिसरातीलच एका डॉक्टरकडून आरसीया नैसर्गिक रित्या मरण पावल्याचं प्रमाणपत्र घेतलं होतं.त्यांच्या घरात काम करणाऱ्या महिलेला घरातच रक्ताचे डाग दिसले आणि हा सर्व प्रकार पोलिसांपर्यंत पोहोचला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं आरोपी बाप लेकाला अटक केली. या गुन्ह्यात डॉक्टरचाही सहभाग दिसून येत असून पोलीस या गुन्ह्याचा अधिक तपास करत असल्याची माहिती तूर्तास समोर आली आहे.

संबंधित बातम्या