पोलीस स्थानकामध्येच करण्यात येते नियमांचे उल्लंघन, अजय जया यांचे आरोप 

पोलीस स्थानकामध्येच करण्यात येते नियमांचे उल्लंघन, अजय जया यांचे आरोप 
  • MG News
  • मार्च 12 2025

Share on  

ठाण्यामध्ये अद्याप पोलीस ठाण्यात संपूर्ण सीसीटीव्ही व ऑडिओ रेकॉर्डिंग बसवले नसल्याचे उघडकीस आले. सुप्रीम कोर्टाने 2020 मध्ये सर्व पोलीस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही व ऑडिओ प्रणाली बसवण्याचे स्पष्ट आदेश दिले असतानाही, ठाणे पोलिस विभागाने या आदेशाची अंमलबजावणी केली नसल्याचे उघडकीस आले आहे. सुप्रीम कोर्टाने (Paramvir Singh Saini vs Baljit Singh, 2020) प्रकरणात आदेश दिले होते की, सर्व पोलिस ठाण्यांमध्ये आणि तपास यंत्रणांमध्ये सीसीटीव्ही आणि ऑडिओ रेकॉर्डिंग अनिवार्य आहे. ही प्रणाली २४x७ कार्यरत असावी आणि डेटा सुरक्षित ठेवावा. नागरिकांना RTI किंवा न्यायालयाच्या आदेशाने हा डेटा उपलब्ध करून द्यावा. असे स्पष्ट आदेश दिले असतानाही ३५ पोलिस ठाण्यांमध्ये फक्त ३५७ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत, जे पुरेसे नाहीत तर ३३ पोलिस ठाण्यांमध्ये प्रत्येकी १० कॅमेरे, एका ठिकाणी १२, आणि दुसऱ्या ठिकाणी १५ कॅमेरे लावले आहे.त तसेच कोणत्याही पोलिस ठाण्यात ऑडिओ रेकॉर्डिंग प्रणाली बसवलेली नाही. ACP, DCP, आणि तपास कार्यालयांमध्ये CCTV बसवलेले नाहीत.

BYTE - अजय जया सामाजिक कार्यकर्ते

संबंधित बातम्या