वर्धा : शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती तरीही  निर्लज्जपणा कृषिमंत्री करताय : खा. अमर काळे 

वर्धा : शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती तरीही  निर्लज्जपणा कृषिमंत्री करताय : खा. अमर काळे 
  • MG News
  • जुलै 21 2025

Share on  

राज्यात शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट आहे. मागील सहा महिन्यात राज्यात ५४३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केलीय तर मराठवाड्यात एकाच दिवशी चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केलीय. अशी परिस्थिती असतांनाही राज्याचे कृषिमंत्री हे सभागृहात रमी गेम खेळताय. यामुळे या  कृषीमंत्र्याचा मुख्यमंत्री यांनी तात्काळ राजीनामा घ्यावा अशी मागणी वर्ध्याचे शरद पवार गटाचे खासदार अमर काळे यांनी केलीय. ते वर्ध्याच्या आर्वीत पत्रकारांशी संवाद साधतं होते.

माणिकराव कोकाटे यांचा सभागृहामध्ये रमी खेळताना चा व्हिडिओ पाहण्यात आला. या गोष्टीचे अतिशय वाईट वाटते की   शेतकऱ्यांचे एवढे प्रश्न महाराष्ट्रात प्रलंबित असताना, शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात होत असताना राज्याचे कृषिमंत्री सभागृहात रमी खेळत आहे. यावरून या खात्याच्या  मंत्र्याचे गांभीर्य किती आहे हे कळून चुकलंय. यामुळे अपेक्षा आहे की एवढ्या बेजबाबदारपणे कृती करणाऱ्या कृषी मंत्राचा तात्काळ राजीनामा   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला पाहिजे. अशा पद्धतीची कृती महाराष्ट्रात चालणार नाही हा संदेश या निमित्ताने त्यांनी दिला पाहिजे असंही खासदार अमर काळे म्हणाले.

संबंधित बातम्या