वर्धा : महाराष्ट्राच्या जनतेसाठी आवश्यक आहे त्या गोष्टीचा आपण विचार करायला हवा. रवींद्र चव्हाण

वर्धा : महाराष्ट्राच्या जनतेसाठी आवश्यक आहे त्या गोष्टीचा आपण विचार करायला हवा.  रवींद्र चव्हाण
  • MG News
  • जुलै 22 2025

Share on  

महाराष्ट्राच्या जनतेसाठी आवश्यक आहे त्या गोष्टीचा आपण विचार करायला हवा. असे सांगत माणिकराव कोकाटे यांच्याविषयी बोलण्यास भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नकार दिला. ते सेवाग्राम येथे आले होते.

मी आज वर्धा जिल्ह्यात सेवाग्राम आणि पवनार या पावनभूमीत आलो आहे  .आज देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आहे, या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक मंडळामध्ये सेवा ही संघटन या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांना चांगली भेट काय द्यावी? तर महाराष्ट्रातील जनतेला आरोग्यासाठी आवश्यक असणारे सगळे विषय कसे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता हा करू शकतो याच प्रत्येकाने प्लॅनिंग केले आहे. काही लोकांनी आरोग्याची शिबिर केली आहे. काही लोकांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी डोनेशन देण्याच ठरवला आहे तर काही लोकांनी रक्तदान करण्याचा ठरवला आहे मला असं वाटतं आजच्या या दिवशी या सगळ्या गोष्टी या महाराष्ट्राच्या जनतेसाठी आवश्यक आहे त्या गोष्टीचा आपण विचार करायला हवा. त्या गोष्टी आज विचार करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही आज आलो आहोत, असेही भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यावेळी सांगितले

संबंधित बातम्या