किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये पश्चिम भारतातील पहिली प्रॉक्सिमल इंटरफॅलेंजियल (PIP) जॉइंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया यशस्वी

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये पश्चिम भारतातील पहिली प्रॉक्सिमल इंटरफॅलेंजियल (PIP) जॉइंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया यशस्वी
  • MG News
  • फेब्रुवारी 20 2025

Share on  

किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये पश्चिम भारतातील पहिली प्रॉक्सिमल इंटरफॅलेंजियल (PIP) जॉइंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया यशस्वी. 

 

नाशिक, महाराष्ट्र – पश्चिम भारतातील पहिले प्रॉक्सिमल इंटरफॅलेंजियल (PIP) जॉइंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया किम्स मानवता हॉस्पिटल मध्ये डॉ. गौरव एस पगारे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरित्या पार पाडली. डॉ. गौरव एस. पगारें  एक प्रख्यात हँड सर्जन आणि डायनर्वोलॉजिस्ट आहेत आणि त्यांना पुणे, मुंबई, फ्रान्स आणि हाँगकाँगमधून हँड सर्जरीचे प्रमाणपत्र प्राप्त आहे.  

रुग्णाला  अंगठ्याच्या PIP जॉइंटमध्ये तीव्र वेदना आणि हालचालींचा अभाव होता, जो एक अप्रतिबंधित फ्रॅक्चरमुळे कठोर झाला होता. असे फ्रॅक्चर्स सामान्यत: पडल्याच्या दुखापतींमुळे, अपघातामुळे किंवा बॉल स्पोर्ट्स  मधून होतात. याशिवाय, आर्थ्रायटिस सारख्या काही कारणांमुळे देखील जॉइंट कडक होऊ शकतो, ज्यामुळे हाताच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो.

PIP जॉइंट हा हाताच्या हालचालीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण तो अंगठ्याच्या हलचालींमध्ये सुमारे ८५% योगदान देतो. या जॉइंटमध्ये मुक्त हालचाल न मिळाल्यास, ग्रिप आणि गॅस्प करण्याची क्षमता गंभीरपणे प्रभावित होते. तथापि, या क्रांतिकारी शस्त्रक्रियेद्वारे रुग्णांना हाताची कार्यक्षमता पुन्हा प्राप्त होण्याची संधी मिळाली आहे.

डॉ. गौरव पगारे म्हणाले की, पश्चिम भारतातील या पहिल्या PIP जॉइंट रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया  यशस्वी झाल्याबद्दल मला अत्यंत अभिमान वाटतो. नाशिकमध्ये ह्या शस्त्रक्रिया सुरू करून आपण हाताशी संबंधित दुखापती आणि रोगांसाठी नवीन उपचार मानक स्थापन करत आहोत, आणि मला आशा आहे की, याचा लाभ भविष्यात अनेक रुग्णांना होईल.
 
डॉ राज नगरकर,  व्यवस्थापकीय संचालक किम्स मानवता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल म्हणाले,अत्याधुनिक तंत्रज्ञान व अनुभवी डॉक्टर्सच्या मदतीने, हे हॉस्पिटल वैद्यकीय उपचारांच्या क्षेत्रात नवनवीन उच्चांक गाठत आहे.
पुढे ते  म्हणाले किम्स मानवता हॉस्पिटल हे नाशिकमधील अग्रगण्य मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल असून, प्रगत तंत्रज्ञान व तज्ञ डॉक्टर्सच्या सहाय्याने उत्कृष्ट वैद्यकीय सेवा पुरवते. हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र अस्थिरोग विभाग कार्यरत असून यामध्ये तज्ञ डॉक्टरांचा समावेश आहे. या पत्रकार परिषेदेस डॉ निलेश सिंग सिओओ, किम्स मानवता हॉस्पिटल तसेच  रुग्णालयातील  डॉक्टर व  वैद्यकीय कर्मचारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित बातम्या