पतीच्या अटकेनंतर काय बोलल्या रोहिणी खडसे?

पतीच्या अटकेनंतर काय बोलल्या रोहिणी खडसे?
  • MG News
  • जुलै 28 2025

Share on  

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल खेवलकर यांना रेव्ह पार्टीच्या आरोपावरून रविवारी पुणे पोलिसांनी अटक केल्यावर चर्चांना उधाण आले आहे. पुणे पोलिसांनी यानंतर पत्रकार परिषद घेत सर्व गोष्टी लवकरच सांगितल्या जातील असेल स्पष्ट केले. या प्रकरणात काही कारवाया सुरू आहेत. त्या कारवायाच्या अंती जे तपासात निष्पन्न होईल, त्या पद्धतीने पुढील कारवाई होईल, असे सांगण्यात आले.

एकनाथ खडसे यांनी जावई दोषी आढळल्यास त्यावर  योग्य ती कारवाई करा, असे सांगितल्यावर प्रांजल यांची पत्नी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे काय म्हणतात याकडे सर्वांचे लक्ष होते. रोहिणी खडसे यांनी एक्स या सोशल मिडिया अकाउंटवर याबाबत मेसेज केला आहे.  रोहिणी खडसे यांनी लिहिले की, कायद्यावर व पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे… प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असतं… योग्य वेळी सत्य बाहेर येईल !..जय महाराष्ट्र!

संबंधित बातम्या