मागील वर्षी जूलै महिन्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सुरु झाल्यावर त्याचा लाभ अडीच कोटी महिलांना झाला.त्यावेळी विधानसभा निवडणूकीची तयारी सुरु असल्याने पात्रतेचे निकष पुर्ण केले आहेत का,हे न बघता अर्ज मंजूर करण्यात आले. मात्र सरकार स्थिरस्थावर झाल्यावर आता लाभार्थीची पात्रता तपासण्यात येत आहे.या तपसणीत अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत
या पाहणीनुसार योजना फक्त अल्प उत्पन गटातील अन्य योजनांचा फायदा न घेणाऱ्या ६५ वर्षाखालील महिलांसाठी असताना १४ हजार २९८ पुरूष लाभार्थी, दोन हजार २८९ सरकारी महिला, संजय गांधी निराधार योजनेतील दोन लाख ३२ हजार महिला, ६५ वर्षांवरील एक लाख १० हजार महिला, एका कुटुंबातील चार लाख महिला आणि चारचाकी वाहन असलेल्या सव्वादोन लाख महिला या योजनेचा लाभ घेत होत्या हे दिसून आले आहे . या बोगस लाभार्थींना योजनेतून वगळण्यात येत आहे तसेच नमो शेतकरी महासन्मान योजनेतील महिला शेतकरी लाडकी बहीण योजनेत होत्या. त्यांचाही शोध घेऊन त्यांना लाडकी बहीणमधून दरवर्षी १८ हजारांऐवजी सहा हजार रुपयेच मिळणार आहेत.