कुठे आहे पावसाचा ऑरेंज अलर्ट कुठे आहे यलो अलर्ट 

कुठे आहे पावसाचा ऑरेंज अलर्ट कुठे आहे यलो अलर्ट 
  • MG News
  • मे 29 2025

Share on  

वेळेआधीच राज्यात दाखल झालेला मान्सून तेव्हढ्याच तीव्रतेने महाराष्ट्र व्यापत आहे. त्यामुळे सध्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पाऊस होत आहे. त्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याकडून  आपल्या महाराष्ट्रातील काही भागांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. तर काही भागांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे.  हवामान खात्याकडून  कोणत्याही भागाला पावलाचा धोकादायक समाजाला जाणारा रेड अलर्ट देण्यात आलेला नाही.  चला तर जाणून घेऊया म्हाराहाष्ट्राच्या कोणत्या भागात काय स्थिती आहे पावसाची

कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे दोन जिल्हे तसेच .विदर्भातील अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया या चार जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे आणि कोकणातील  रायगड उत्तर महाराष्ट्रातील , जळगाव, जिल्हा तसेच  ,मराठवाड्यतील  छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, जिल्हे विदर्भातील  अकोला, बुलडाणा, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा कोल्हापूर जिल्हातील पश्चिमेकडील डोंगराळ भाग यांना पावसाचा पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.  ज्या ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे त्या ठिकाणी तुरळक स्वरूपाचा तर ऑरेंज अलर्ट देण्यात आलेल्या ठिकाणी माध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल . 

संबंधित बातम्या