काल पावसाळी अधिवेशनात कामकाज झाल्यावर काँग्रेसच्या महिला खासदार गायकवाड, प्रतिभा धानोरकर, शोभा बच्छाव यांनी मराठी भाषिकांविषयी अयोग्य वक्तव्य केलेल्या निशिकांत दुबे यांना मराठी हिसका दाखवला. . यावेळी मराठी भाषिकांविरोधातली तुमची अरेरावी आम्ही खपवून घेणार नाही. तुम्ही कुणाला आणि कसे आपटून आपटून मारणार?, तुमचे वागणे योग्य नाहीय, असं य खासदारांनी निशिकांत दुबेंना सुनावलं. यानंतर वर्षा गायकवाड यांनी जय महाराष्ट्र अशा घोषणा दिल्या. त्यावर आप तो मेरी बहन है, असं म्हणत निशिकांत दुबे हात जोडून तिकडून निघून गेले. यावेळी महाराष्ट्रातील महायुती आणि महाविकास आघाडीतील खासदार देखील आजूबाजूला उपस्थित होते
हिंदीच्या मुद्द्यावरुन मनसेप्रमुख राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. यादरम्यान मनसेच्या कार्यकर्त्यांनी मीरा-भाईंदरमधील एका परप्रांतीय दुकानदाराने मराठी बोलणार नाही, असं म्हटल्याने हात उचलला. यावरुन निशिकांत दुबेंनी ठाकरे बंधूंवर हल्लाबोल केला होता. मराठी लोक कुणाची भाकर खातायत?, आमच्या पैशांवर तुम्ही मराठी लोक जगताय, असं निशिकांत दुबे म्हणाले. तसेच मराठी लोकांकडे कोणते उद्योग आहेत?, मराठी लोक किती टॅक्स देतात सांगा, असं म्हणत निशिकांत दुबेंनी मराठी लोकांना डिवचलं होते