यवतमाळ : राजकीय वैरातून   कुटूंब संपविण्याचा कट, 

यवतमाळ : राजकीय वैरातून   कुटूंब संपविण्याचा कट, 
  • MG News
  • जुलै 27 2025

Share on  

रात्रीत घराभोवती वीजप्रवाह असलेले कुंपण उभारुन त्याद्वारे कुटुंबाला संपवण्याचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आली आहे.या घटनेत सविता पवार नावाच्या ३७ वर्षीय महिलेचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला. तर महिलेचा पती  जखमी झाला.  मनोज पवार असे जखमी पतीचे नाव आहे‌.ही घटना यवतमाळच्या घाटंजी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या अंजी नाईक येथे घडली.घटना घडल्यावर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जावू नये यासाठी  गावात दगंल नियंत्रण पथक आणि पोलिस कर्मचाऱ्यांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे.  संशयितांवर  गुन्हे दाखल करण्यात आले असून दोघांना घाटंजी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

संबंधित बातम्या