यवतमाळ : राज्यमंत्र्याच नाव लिहलेल्या ट्रकमधून अवैध दारु विक्री 

यवतमाळ : राज्यमंत्र्याच नाव लिहलेल्या ट्रकमधून अवैध दारु विक्री 
  • MG News
  • जुलै 25 2025

Share on  

परभणी जिल्ह्यातील जिंतूरच्या  आमदार आणि राज्यमंत्री मेघनादीदी साकोरे बोर्डीकर' यांचे नाव लिहलेल्या ट्रकमधून होणारी अवैध दारु विक्री पुसद पोलीसांनी रोखली.या प्रकरणी पोलिसांनी ट्रकचालकास अटक केली .ट्रकचालकाने पैसांची गरज भासल्याने हे कृत्य केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार विश्वास इंटरप्राइजेस आणि ट्रान्सपोर्टच्या मालकीचा ट्रक  हा पुणे येथील हडपसरमधून ४० लाख रुपये किमतीची 'ग्रीन लेबल' ही दारू घेऊन नागपूरकडे जात होता. एनडीजे लिक्विड्स प्रायव्हेट लिमिटेड येथे ही दारू पोहचवायची होती. मात्र, ट्रकचालक नागपूरकडे न जाता पुसद शहरात पोहोचला. येथे माहूर मार्गावर एका मोकळया ठिकाणी ट्रक उभा करून ट्रक चालक दारू विक्री करू लागला. तीन दुचाकींवरून आलेल्या सहा तरुणांनी सहा पेट्या दारू खरेदी केली. पुसद पोलिसांना याबाबत कळताच त्यांनी मनीष ईश्वरू सुरुळे जेश्वर मधुकर पवार  सचिन उद्दल चव्हाण  सचिन सावन चव्हाण  गोकुळ बाबूसिंग चव्हाण , विक्रम बळीराम जाधव  सर्व रा. तुळशीनगर ता. महागाव आणि प्रवीण दत्ताजी जोहरे  यांना ताब्यात घेतले.

या वाहनावर 'राज्यमंत्री मेघनादीदी साकोरे बोर्डीकर' असे ठळकपणे लिहिले आहे. ट्रकमालक कोहकाडे हे राज्यमंत्री बोर्डीकर यांचे नातेवाईक असल्याची माहिती चालकाने दिली. हा ट्रक बुधवारीच नागपूर येथे पोहचणे अपेक्षित होते. मात्र गोकुळ चव्हाण याच्या माध्यमातून चालकाने तो पुसद येथे आणून दारू विकण्याचा प्रयत्न केला. या दारूच्या सर्व पावत्या, कर भरणा आदी कागदपत्रे योग्य असल्याचे वानखेडे यांनी सांगितले. मात्र, यातील दारूच्या १० पेट्या चालकाने अवैधपणे विकल्या.  या कारवाईत पोलिसांनी ४० लाखांची दारू, ट्रक, तीन दुचाकी, सात मोबाईल असा ६४ लाख ७२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

 

संबंधित बातम्या