तेलंगणा, गुजरात राज्यातून होणाऱ्या बोगस बियाणांचा काळाबाजार रोखण्याचे यंदाही कृषी विभागासमोर आव्हान 

तेलंगणा, गुजरात राज्यातून होणाऱ्या बोगस बियाणांचा काळाबाजार रोखण्याचे यंदाही कृषी विभागासमोर आव्हान 
  • MG News
  • मे 29 2025

Share on  

 बोगस बियाणांच्या वाढत्या तक्रारींना आळा घालण्यासाठी कृषी विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत, असे सांगितले जाते. मात्र यवतमाळ जिल्ह्यात बोगस बियाणे विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे.तेलंगणा, गुजरात राज्यातून होणाऱ्या बोगस बियाणे काळाबाजार रोखण्याचे यंदाही आव्हान कृषी विभागासमोर आहे.खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. बोगस बियाणांच्या वाढत्या तक्रारींना आळा घालण्यासाठी कृषी विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत. या आठवड्यात मारेगाव, राळेगाव, बाभुळगाव, आर्णी या तालुक्यात कृषी विभागाच्या भरारी पथकाणे धाडी टाकून प्रतिबंधित बियाणे जप्त करून पोलीस ठाण्यात तक्रारी दिल्या आहे.

मागील काही वर्षांपासून बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. काही वेळा या बियाणांमुळे उगमच होत नाही, किंवा उत्पादन क्षमतेत लक्षणीय घट येते. त्यामुळे शेतकरी आर्थिक व मानसिकदृष्ट्या संकटात सापडतात. शेतकऱ्यांना जास्त उत्पादन होण्याचे आमिष दाखवून बोगस बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारले जाते.यंदा अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कृषी विभागाने वेळेआधीच पावले उचलली असून, तालुक्याच्या विविध भागांमध्ये तपासणी सुरू करण्यात आली असा दावा कृषी विभाग करत आहे. काही कारवाया केल्या असल्या तरी त्यातून कृषी विभागाच्या हातात मोठा मासा गळाला लागला नाही. बोगस बियाणांपासून बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांनी अधिकृत व परवानाधारक विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदी करावीत, अशी सूचना कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. बियाणे खरेदी करताना बिलाची मागणी करणे आणि पॅकिंगवरील तपशील काळजीपूर्वक पाहणे अत्यावश्यक आहे.सरकारी दुकानांमध्ये सरकार मान्य बीटी कापसाचे बियाणं आहे. 

सरकारने 2008 साली बीटीला याला मान्यता दिली होती.  ती आता अडकवून ठेवू नये. हंगामाच्या सुरुवातीपासूनच कृषी विभाग शेतकऱ्यांना आवाहन केले आहे. जे काही प्रतिबंधित एसटीबीटी बियाणं आपण म्हणतो तसं बियाणं शेतकऱ्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये  खरेदी करू येऊ नये. कारण त्याचे बिल मिळत नाही आणि काही जर्मिनेशन चा प्रॉब्लेम झाला किंवा आणखी काही समस्या निर्माण झाले तर त्या सुद्धा तक्रार करता येत नाही.

कापूस पिकवणारी पंढरी म्हणून या विदर्भाकडे बघितले जाते. मुख्यता कापूसच या ठिकाणी पिकवला जात. कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या आत्महत्या होताना दिसतात. तेलंगणा आणि गुजरात  राज्यातून बियाणे येतात. कृषी विभाग आणि पोलीस विभागाच्या संगमत असावे  शासनाचा पाठिंबा शिवाय असं होऊ शकत नाही. गुजरात मधले बियाणे उत्पादक आहे हे जगण्यासाठी कदाचित महाराष्ट्राचं बळी दिल्या जात आहे. हा प्रकार थांबला नाही तर शेतकऱ्यांमध्ये आत्महत्याच  वाढेल. त्वरित अशा चोरट्या मार्गाने येणाऱ्या बियाण्यावर ताबडतोब बंदी आणावी.

संबंधित बातम्या