भुसावळ हादरले ; गोळीबारात तरुणाची हत्या

भुसावळ हादरले ; गोळीबारात तरुणाची हत्या
  • MG News
  • जानेवारी 10 2025

Share on  

भुसावळ शहरात जाम मोहल्ला चहाच्या दुकानात तरुणावर गोळीबार करून तरुणाची करण्यात आली हत्या 

जाम मोहल्ला परिसरातील अमरदीप टॉकीज जवळील चहाच्या दुकानात चहा पीत असताना चार अज्ञातांनी दुकानात प्रवेश करत तरुणावर केला गोळीबार 

गोळीबारात तेहरीम नासिर शेख हा तरुण ठार 

घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी भेट देऊन केली पाहणी 

गोळीबार करणाऱ्या अज्ञातांचा पुणे शाखेच्या पथकाकडून शोध सुरू असल्याची अप्पर पोलीस अधीक्षकांची माहिती 
 भुसावळ शहरात सकाळी सात वाजेच्या सुमारास चार अज्ञातांकडून तरुणावर गोळीबार करून तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादाय घटना समोर आली असून भुसावळ मधील जाम मोहल्ला परिसरात अमरदीप टॉकीज जवळील चहाच्या दुकानात ही घटना घडली आहे. तेहरीम नासिर शेख असे गोळीबार करून हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून या घटनेनंतर अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान गोळीबार करून हत्या करणाऱ्या अज्ञातांचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून शोध सुरू असल्याची माहिती ही पोलिसांनी दिली असून पूर्व वैमनस्यातून ही हत्या करण्यात आली  याबाबत देखील चौकशी केली जात असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी दिली आहे..

संबंधित बातम्या